नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही
नास्तिकतेचा विचार भारतामध्ये शेकडो वर्षांपासून आहे; पण आपल्याकडे नास्तिकता अद्याप रुजलेली नाही. नास्तिकतेचा विचार करणाऱ्यांना आजही एकटेपणाची भीती वाटते. समाजात तुटल्यासारखं वाटतं. जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात, त्यांचा लढा खरेतर आस्तिकांच्या विरोधात नसतो, तर तो आस्तिक विचारांच्या विरोधात असतो. आगरकर नेहमी म्हणायचे की विचारकलहाला कशाला घाबरायचं? नास्तिक आपले विचार ठामपणे …